भंडारा: आगामी दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भंडारा जिल्ह्यातून ५ सराईत गुन्हेगारांना तडीपार
आगामी दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भंडारा जिल्हा पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. याच मोहिमेअंतर्गत, दारू विक्री आणि तस्करीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना भंडारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि शांततेत उत्सव साजरा करता यावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे इतर गुन्हेगारांवरही पोलिसांचा वचक बसेल आणि ते अशा गैरकृत्यांपासून दूर राहतील..