भद्रावती: शासनाच्या "हरीत महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र " अभियानाअंतर्गत पिपरबोडी येथे वनविभागाव्दारे वृक्षलागवड.
आपल्या परिसरात पर्यावरण पुरक आणी हरीत उपक्रमांना चालना देण्यासाठी राज्य शासनातर्फे हरीत महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र अभियानाअंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे मौजा पिपरबोडी येथील वनविभागाच्या कक्ष क्रमांक २१३ मधे विवीध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांच्यासह मान्यवर ऊपस्थीत होते.