उत्तर सोलापूर: बेगम पेठेत चहा कॅन्टीनवाल्याकडून २९ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त-पो.उपायुक्त विजय कबाडे यांची माहिती
चहा कॅन्टीन चालवत असणाऱ्या ३० वर्षीय अमिर हामजा अखलाख दिना (रा. बेगमपेठ) याच्या जवळून २९ ग्रॅम मेफेड्रॉन व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी ३ च्या सुमारास कर्णिक नगर, चिल्ड्रन पार्क येथे केली. याची किंमत जवळपास ७२ हजार ८०० रुपये आहे.अशी माहिती पो.उपायुक्त विजय कबाडे यांनी सोमवारी सायं गांधी नगर येथे पत्रकार परिषदेत दिली