घुग्घुस शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवा जीवदान मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने केंद्र पुरस्कृत ‘अमृत 2.0 अभियान’ अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण 93.98 कोटी रुपयांचा निधी आज दि 29 ऑक्टोबर ला 12 वाजता मंजूर केला आहे. शासनाचा निर्णय नगर विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे घुग्घुस शहराला शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.