कळंब: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या तीरझडा येथील घटना
एका अल्पभूधारक शेतकऱ्याने सततची नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या दरम्यान ग्रामपंचायतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना तिरझडा येथे उघडकीस आली सुभाष वसंतराव ठुसे वय 35 असे मृत शेतकऱ्याचे नाव असून अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.