जालना: संत रोहिदास महाराज स्मारकासाठी साखळी उपोषण तीव्र; भर उन्हात आंदोलन, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
Jalna, Jalna | Apr 19, 2026 जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी समितीच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण अधिक तीव्र होत असून आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन भाजपचे महानगराध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या प्रभागात आणि त्यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावरच सुरू असल्याने या प्रश्नाकडे अधिक लक्ष वेधले जात आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत रोहिदास महाराज स्मारक उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी वारंवार निवेद