अकोला बसस्थानकावर चोरीचा प्रयत्न खदान पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत उधळून लावण्यात आला. वाशिम येथील अमीता राठोड या नाशिकहून आपल्या गावी परतत असताना अकोला बसस्थानकावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅगमधील पर्स चोरली. सदर पर्समध्ये साडेसात ग्रॅम सोन्याची चैन व काही रोकड होती.घटनेची माहिती मिळताच संबंधित एसटी बस खदान पोलीस ठाण्यासमोर थांबवण्यात आली.खदान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बसची तपासणी केली त्यानंतर मुद्देमाल दिसून आला मात्र आरोपी फरार झाला.