कराड: यशवंतराव चव्हाण स्मृतिदिनाला सरकारचा विसर; हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार : आ. शशिकांत शिंदे
Karad, Satara | Nov 25, 2025 सुसंस्कृत आणि मूल्याधिष्ठित राजकारणाची वाट दाखवणारे, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे राज्यकारभारातील महानायक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्य सरकारने अधिकृत कार्यक्रम न घेणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केली. कराड येथील प्रीतीसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली.