जालना: जालना जिल्ह्यात युवा सेनेत अभिमन्यू खोतकर यांची लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड
Jalna, Jalna | Apr 25, 2026 जालना जिल्हा युवा सेनेच्या लोकसभा संपर्कप्रमुखपदी अभिमन्यू खोतकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या निवडीमुळे युवा सेनेच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अभिमन्यू खोतकर यांच्या निवडीचे शहरातील युवा सेना कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी नगरसेवक अमोल ठाकूर, निखिल पगारे, शुभम टेकाळे यांच्यास