नागपूर शहर: अंबाझरी बायपास रोडवर हद्दपार आरोपीला शस्त्रासह पोलिसांनी केली अटक
16 सप्टेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अंबाजरी बायपास रोडवर हद्दपार आरोपीला शस्त्रसह अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव संदेश उर्फ संग्या पडांगळे असे सांगण्यात आले असून आरोपीकडून एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे