हिंगोली: हिंगोली व सेनगाव तालुक्यांना दिलासा; नुकसानग्रस्त यादीत होणार समावेश आमदार तानाजी मुटकुळे यांची माहिती
हिंगोलीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या हिंगोली आणि सेनगाव या दोन तालुक्यांचा प्राथमिक नुकसानग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती. या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.