महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या 383 गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने ऑनलाईन नोंदणी व अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.