अमरावती: सक्करसाथ, सराफा परिसरात मनपाची मोठी कारवाई – दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि ३ ट्रक माल जप्त
*सक्करसाथ, सराफा परिसरात मनपाची मोठी कारवाई – दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि ३ ट्रक माल जप्त अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिक बंदी मोहिमेला गती देत महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ ऑक्टोंबर व दिनांक १७ ऑक्टोंबर, २०२५ सक्करसाथ आणि सराफा परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली.