पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 28 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजताच्या तुम्हाला दिलेल्या माहितीनुसार, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भांडेवाडी येथे झालेल्या खून प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून यामध्ये मृतक वेडसर प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतकामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते आणि आज त्याने शिवीगाळ केल्यामुळे आरोपीला राग आला आणि या रागातूनच त्याने हे भयंकर कृत्य केले.