जालना: एकाच दिवशी 1202 विनातिकीट प्रवासी पकडले - नांदेड विभागात 4 लाख 90 हजाराचा दंड वसूल
Jalna, Jalna | Oct 8, 2025 दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकाच दिवशी 1 हजार 202 विनातिकीट, अनियमित प्रवासी तसेच अनबुक्ड सामानासह प्रवास करणार्यांना पकडण्यात आले. या कारवाईतून एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचा दंड आणि तिकीट रक्कम वसूल करण्यात आली. 1 मे 2025 नंतरची ही सर्वात मोठी एकदिवसीय कारवाई ठरली आहे. अशी माहिती बुधवार दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.यमध्ये मनमाड-औरंगाबाद सह विविध मार्ग तपासले.