बारामती: स्वामी चिंचोली येथे जमीन मोजणीवरून वाद चिघळला ; भावकीतील तिघांवर कोयत्याने हल्ला
Baramati, Pune | Sep 14, 2025 दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे सामाईक क्षेत्रातील जमिनीची मोजणी का आणली, या कारणावरून भावकीतील तीन जणांवर चक्क कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी दौंड पोलिसांत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील सर्व आरोपी फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.