परळी: बीड मधील ओबीसी मेळाव्यास उपस्थित राहणार आमदार धनंजय मुंडे यांचे आवाहन
Parli, Beed | Oct 13, 2025 समता परिषदेच्या वतीने बीड मधील ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या ओबीसी मेळाव्यास राज्यभरातून ओबीसी समाज बांधव ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत तर या मेळाव्यास मी देखील उपस्थित राहणार आहे हे निश्चित आहे व सर्वांनी राहावे असे आवाहन परळी मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले आहे तसेच ते म्हणाले ओबीसीच्या आरक्षणावर गदा येऊ नये हे देखील नक्कीच आहे त्यासाठी सर्वांनी लढा देणे गरजेचे आहे.