जळगाव: चंद्रीकावाडी येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू; चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चाळीसगाव ग्रामीण भागातील चंद्रीकावाडी येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली आहे. नातेवाईकांनी त्यांना मृत अवस्थेत चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.