कोंढव्यातील रेकॉर्डवरील गुंडांनी कोंढव्यातील शेरखान चाळ येथे जाऊन दगडाने सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. “हम इधरके भाई लोग है, मोक्का जैसे गुन्हे से बाहेर आएले है,” असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत माजविली. परंतु, त्यांच्या दहशतीमुळे कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. तब्बल १७ दिवसांनी सोशल मीडिया व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे दहशतीचा हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला.