हवेली: रावण टोळीवर गुंडा विरोधी पथकाची धडक; पिंपरी चिंचवड येथे तीन पाहिजे आरोपी व दोन बालकांसह पाच जण ताब्यात
Haveli, Pune | Sep 22, 2025 गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड पोलिसांनी चिखली पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील रावण टोळीचे ३ पाहिजे आरोपी आणि २ विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ देशी बनावटीच्या पिस्तुलांसह ३ जिवंत काडतुसे, १ वापरलेले काडतूस आणि एक बलेनो कार असा एकूण ८ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.