'धानाचे कोठार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अन्नदाता शेतकरी सध्या कर्जाच्या विळख्यात अडकला असून निराशेच्या गर्तेत जीवन जगत आहे. या लोकसभा मतदारसंघातील जवळपास ८० टक्के शेतकरी एक हेक्टरपेक्षा कमी शेतीचे मालक आहेत. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मोठ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे. या नुकसानीमुळे प्रती हेक्टरी सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा केला जात आहे.