नगरपरिषद बल्लारपूर निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या अधिकृत, उमेदवारांच्या प्रचारार्थ टिळक वार्ड आणि साईबाबा वॉर्ड येथील भव्य जाहीर सभेला उपस्थित राहीलो. बल्लारपूर येथे झालेल्या दोन्ही सभेत प्रचंड उत्साह, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि सभास्थळी उमटलेली उत्स्फूर्त उपस्थिती पाहता, या सभेत केवळ प्रचाराचा कार्यक्रम नसून आगामी निवडणुकीच्या दिशेने शक्तिशाली जनमताचा आवाज असल्याचे स्पष्ट जाणवले.