अकोला: प्रमिलाताई ओक सभागृहात 'संविधान शिल्पकार' नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद
Akola, Akola | Oct 17, 2025 भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या 'जागर संविधानाचा' उपक्रमांतर्गत दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित 'संविधान शिल्पकार' नाटकास अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रमिलाताई ओक सभागृहात सादर झालेल्या या दोन अंकी नाटकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, संविधान निर्मिती व प्रास्ताविकेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. संजय जीवने लिखित व सांची जीवने दिग्दर्शित या नाटकात ५० कलाकारांनी सहभाग घेतला. त्याआधी, १६ ऑक्टोबर रोजी गायक स्मित वंजारी व इत