खटाव: कटगुण येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून; पती पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात
Khatav, Satara | Sep 17, 2025 सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत कटगुण, तालुका खटाव येथे गोसावी वस्ती परिसरात वास्तव्य असणाऱ्या पिंकी जाधव या वीस वर्षीय पत्नीचा पतीने लोखंडी रोड डोक्यात घालून केला. बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली. खुनानंतर पती विनोद विजय जाधव याला पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कटगुण येथे महामार्गालगत गोसावी वस्ती असून तेथे वास्तव्य करणारे सर्वजण भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत आहेत.