उल्हासनगर क्रमांक पाच येथे ही लाईन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका सोसायटीतील बाप लेकांना त्याच सोसायटीतील टोळक्याने जुन्या वादातून वेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे