महागांव तालुक्यातील मोरथ परीसरात अवैध रेती तस्करीविरोधात कारवाईदरम्यान पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी महागाव पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी शेख हबीब शेख चांद, शेख नूर शेख चांद, शेख गुलाब उर्फ गुलाब शेख, शेख लाला शेख खाजा, नसीब पठाण सर्व राहणार मोरथ यांना ३ दिवसाची कोठडी सुनावली.