सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 'दाबो' पबमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या रक्तरंजित वादात गंभीर जखमी झालेल्या गौरव कारडा या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून गौरवची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र अखेर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे आता या प्रकरणातील मृतांची संख्या दोन झाली आहे.काही दिवसांपूर्वी दाबो पबमध्ये किरकोळ वादातून दोन गटांत तुफान राडा झाला होता.