जालना: जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप आज दिनांक 11 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या लक्कडकोट चौकातील एका जमिनीच्या वादावरून आता मोठा संघर्ष उभा ठाकला आहे. ही जमीन कायदेशीररित्या आपलीच असतानाही, काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तेथील फलक आणि बॅनरची तोडफोड केली असून, यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप संजय कटके यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे