लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात अनेक महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसी न झाल्याने, मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अनेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळत नाही. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यानेही अडचणी वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी लाडक्या बहिणींना घाबरू नये, असा दिलासा दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.