गडचिरोली: सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थितीमुळे शेकडो हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा आपले उग्र रूप दाखवले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील कोत्तापल्ली, आयपेटा, वडधम, मुत्तापूर माल, अंकिसा, असरअल्ली, सुकारेली, टेकडाताला या गावांतील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची उत्पादकांना बसला. तब्बल १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.