बायोमेट्रिक पध्दतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना नोंदणी साठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. चंद्रपुर व बल्लारपुर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा व मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करून घ्यावी व शासकिय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आज दि 30 नोव्हेंबर ला 4 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर कडून करण्यात येत आहे.