झपाट्याने औद्योगीकरणामुळे विकसित झालेल्या खंडाळा तालुक्यातील कोरडवाहू शेती विभागातील १४ गावांनी पाणीटंचाईविरोधात एल्गार पुकारला आहे. सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री लाभले असतानाही आमचा ‘पाणी प्रश्न’ अद्याप सुटलेला नाही. येत्या काळातही प्रश्न मार्गी लागला नाही, तर संबंधित मंत्र्यांना खंडाळा तालुक्यात फिरू देणार नाही आणि त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा तीव्र इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तालुक्यातील १४ गावांतील शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे.