जिल्ह्यात 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन पाळण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिनांक 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम ३६ चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे. सदर आदेश दि. 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील, असे आज जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमुद आहे.