नागपूर शहर: स्टार बस मध्ये चोरी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल
4 नोव्हेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंगला शिरसागर राहणार वर्धा या त्यांच्या बहिणीसोबत कळमेश्वर येथे भावाच्या घरी गेल्या होत्या. तेथून सिटी बसने ब्राह्मणी फाटा व तिथून पोलीस ठाणे सीताबर्डी हद्दीतील इटर्निटी मॉल समोर उतरल्या असता अज्ञात आरोपीने त्यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख 71 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.