जळगाव: निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर ओतले ज्वलनशीन पदार्थ; पोलीसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला
फैजपूर येथील सेवानिवृत्त सहायक फौजदार शकील शेख यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने संतप्त होऊन बुधवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख यांनी स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तातडीने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.