नाशिक: कुंभमेळा पर्वणीत येणारे भाविक व वाहतूकीचे सुक्ष्म नियोजन करा : डॉ. गेडाम
Nashik, Nashik | Nov 6, 2025 नाशिक, दि. 6 नाव्हेंबर, आगामी सिंहस्थ कुंभमेळयात पर्वणी कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्यने भाविक उपस्थित राहणार आहेत. यादृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार यासह पायी येणारे भाविक, त्यांना इच्छीत स्थळी पोहचण्याची व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, गर्दीचे नियोजन व अनुषंगिक बाबी याबाबत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.