वर्धा: पारंपरिक :लगीनघाईची नांदी! बोरगाव परिसरात सामूहिक तुळशी विवाह सोहळ्याची धूम, संस्कृतीचा पारंपरिक थाट..
Wardha, Wardha | Nov 5, 2025 दिवाळीचा सण संपला, की लगबग सुरू होते ती लगीनघाईची आणि त्याआधी येतो सर्वात महत्त्वाचा, पारंपरिक आणि अत्यंत मंगलमय सोहळा - तो म्हणजे तुळशी विवाह आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, शहरात तुळशीच्या लग्नाची धूम पाहायला मिळतेय. आणि असाच एक अत्यंत देखणा आणि उत्साहाने भरलेला सामूहिक तुळशी विवाह सोहळा आज वर्ध्यातील बोरगाव परिसरात पार पडला. असल्याचे आज 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पाहायला मिळाले