केळापूर: शहरातील विश्रामगृह येथे मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत पार पडली भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठक.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पांढरकवडा शहरातील विश्रामगृह येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थित राहून भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.