चांदूर रेल्वे: तालुक्यात व शहरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात ;मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी
तालुका व शहरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात भक्तिभाव, उत्साह आणि श्रद्धेच्या वातावरणात तालुका तसेच शहरात नवरात्रोत्सवाला मंगलमय सुरुवात झाली आहे. घटस्थापना करून देवीच्या आराधनेला प्रारंभ झाला असून, मंदिर परिसरासह सार्वजनिक मंडपांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत आहे.शहरातील प्रमुख मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि विविध थीमद्वारे नवरात्रोत्सवाला रंगत आणली आहे. ढोल-ताशांच्या गजरात देवीची स्थापना करण्यात आली. तर, तालुक्यातील गावांमध्येही देवीपूजन झाले.