वर्धा: सर्व जाती-धर्मांत सलोखा टिकवणे ही काळाची गरज – खासदार अमर काळे
Wardha, Wardha | Sep 21, 2025 केरला समाज वर्धा तर्फे आयोजित ओनम उत्सवात खासदार अमर काळे यांनी उपस्थित राहून समाजातील सांस्कृतिक सलोख्याचे महत्त्व अधोरेखित केले.आपल्या भाषणात त्यांनी भारतात विविध जाती-धर्मांतील ऐक्य आणि सलोखा टिकवण्याचे आवाहन केले. तसेच केरला समाजाच्या योगदानाबद्दल आभार मानत, समाजाच्या समस्या सोडविण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले.