गोंदिया: पानमसाला विक्रेत्याकडून १५ हजारांचा माल जप्त, कुळवा येथे केली कारवाई
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 गुटखा व सुगंधित पानमसाला विक्रीवरील बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी विक्रेत्यावर कारवाई करीत तब्बल १५ हजार ६२० रुपयांचा पानमसाला माल जप्त केला आहे. कारवाई बुधवारी (दि. १५) दुपारी शहरातील कुडवा लाईन परिसरात करण्यात आली.कुडवा लाईन येथील सुनील गजभिये यांच्या चाय-नाश्ता दुकानासमोर आरोपी अनिल मूलचंद दैलानी (४१, रा. सिंधी कॉलनी, वडसा) याला पकडण्यात आले. त्याच्या जवळ वेगवेगळ्या कंपन्यांचा १५ हजार ६२० रुपये किमतीचा सुगंधित पान