दिग्रस: शहरातील प्रभाग २ मधील २६ युवकांचा शिवसेना शिंदे गटात धडाकेबाज प्रवेश, मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत औपचारिक प्रवेश
दिग्रस शहरातील प्रभाग क्र. २ येथील तब्बल २६ युवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षबळात लक्षणीय वाढ केली आहे. आमदार तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विकासात्मक दृष्टीकोनासह प्रभाग क्रमांक २ चे शिवसेनेचे उमेदवार यांच्या सातत्यपूर्ण समाजकार्यातून प्रेरित होऊन या युवकांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत आज दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान हा पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.