मलकापूर येथील गंगा प्रदीप सोनवणे या महिलेने आर्थिक फसवणुकीप्रकरणी कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तुषार दिलीप देशमुख याने पार्टनरशिपमध्ये हॉटेल सुरू करण्याचे सांगून टप्प्याटप्प्याने ४ लाख ८५ हजार रुपये घेतले, पण हॉटेल न सुरू करता फसवणूक केल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. पैसे परत मागितल्यास प्लॉट विकल्यानंतर देतो असे सांगून संबंधित व्यक्ती टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. खदान पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने उपोषण सुरू केलं