जळगाव: जामनेर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस: नेरी गावात शिरले पाणी; खडकी पुलावर पूर, जळगाव-जामनेर मार्ग बंद
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासूनझालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नेरी, सूनसगावसह अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः नेरी गावात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.