नगर: शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर सावता महाराज मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना केली अटक
15 सप्टेंबर रोजी फिर्यादी विवेक लक्ष्मण शिंदे यांनी फिर्याद दिली कोणीतरी अज्ञात चोरट्याने शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर सावता महाराज मंदिराचे कुलूप तोडून दरवाजा खोलून मंदिरातील मूर्तीवरील चांदीचे मुखवट सोन्याची नथ बिंदी सोन्याचे मंगळसूत्र दोन पंचधातूंचे मुकुट आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून एक लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच सावता मंदिर येथे तोडफोड करून नुकसान केले भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून पंधराशे रुपये कोणीतरी अज्ञात चोट्यांनी चोरून नेले