भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार देवेश सुभाष पाटील (वय 22, रा. जिजाऊनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास निमखेडी रोडावरील चंदू आण्णा नगर चौकात घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.