श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक
श्रीवर्धन शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. श्रीवर्धन येथील पेशवे स्मारक संग्रहालय बांधकाम, परिसराच्या सौंदर्यवृद्धी व पर्यटकांसाठी सोयी सुविधांसाठी विकासाच्या कामांना गती द्यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच परिसरात उभारण्यासाठी जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले. या बैठकीत पेशवे स्मारक संग्रहालयासह, डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता पार्क, शहराची विकास योजना, छत्रपती शिवाजी चौक परिसरातील उद्यान विकसित करणे, पार्किंग सुविधा, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, प्रांत कार्यालय एकाच परिसरात उभारण्यासाठी जागा निश्चिती अशा विविध विषयांवर चर्चा झाली.