विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नवीन नियमावली आणि कायद्याच्या विरोधात आज नागपुरात 'युजीसी विरोध कृती समिती'च्या वतीने भव्य 'आक्रोश धरणे' आंदोलन करण्यात आले.शेकडो आंदोलकांनी एकत्र येत केंद्र सरकार आणि युजीसी प्रशासनाचा निषेध केला.या आंदोलनात विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या हातात "आम्ही नव्या युजीसी कायद्याचा विरोध करतो" आणि "शिक्षणाच्या सन्मानार्थ मैदानात" असे फलक पाहायला मिळाले.