मानगाव: ताम्हिणी घाटात भीषण अपघात, दरड गाडीवर कोसळल्याने महिलेचा मृत्यू
Mangaon, Raigad | Oct 30, 2025 सनरुफ असलेल्या चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही घटना आज गुरुवारी सकाळी घडली असून यामध्ये ४३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती आहे. स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासोबत पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत होत्या. यावेळी ताम्हिणी घाटात त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. या दरडीमध्ये मोठा दगड थेट त्यांच्या गाडीवर आदळला. ज्यामुळे गाडीचे सनरूफ फुटल्याने दगड त्यांच्या डोक्यावर पडला. दरम्यान त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.