मोहाडी: सकरला ते धोप रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाची कारवाई, ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी तालुक्यातील सकरला ते धोप रस्त्यावर दि. 15 ऑक्टोंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजता च्या सुमारास तहसीलदार तुमसर यांच्या भरारी पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्र.MH 36 AL 87 42 यावर कारवाई करत सदर ट्रॅक्टर व त्यातील 1 ब्रास रेती असा एकूण 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालक मालक यांच्याविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.